वाशीम,
Shyam Khode वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी शासनाने १४५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून, नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ. श्याम खोडे यांनी दिली.
अतिवृष्टीने वाशीम तालुयातील एकूण १३३ गावातील ५४ हजार ९८५ शेतकर्यांची ४६ हजार ७२६.९६ हेटर आर जमीन बाधित होऊन प्रति हेटर रुपये ८५०० नुसार एकूण रुपये ३९ कोटी ७६ लाख ६८ हजार ७८७ रुपये अपेक्षीत निधी मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगरूळनाथ तालुयातील १३५ गावे बाधित असून, बाधित शेतकर्यांची संख्या ४२ हजार ०९२ असून एकूण बाधित क्षेत्र ३० हजार ९६६.२५ हेटर आर असून एकूण रुपये २७ कोटी २२ लाख १२ हजार २३३ रुपये अपेक्षीत निधी मंजूर करण्यात आला. कारंजा तालुयातील ३१ गावे बाधित असून, बाधित शेतकर्यांची संख्या ११८७ आहे. एकूण बाधित क्षेत्र ६३९.२५ हेटर आर असून, एकूण ५४ लाख ४४ हजार ७०६ रुपये इतका अपेक्षीत निधी मंजूर झाला. मानोरा तालुयातील बाधित गावांची संख्या २० असून, शेतकरी संख्या ७६४ आहे. एकूण बाधित क्षेत्र ५४२.७६ हेटर आर असून, एकूण ३८ लाख ४ हजार ८७६ रुपये इतका अपेक्षीत निधी मंजूर झाला आहे.
रिसोड तालुयातील बाधित गावांची संख्या १०२ असून, बाधित शेतकर्यांची संख्या ५२ हजार १०४ असून, बाधित क्षेत्र ४२ हजार ६१९.०४ हेटर आर असून, एकूण ३६ कोटी २८ लाख ५८ हजार ६११ रुपये अपेक्षीत निधी मंजूर झाला आहे. मालेगाव तालुयातील बाधित गावांची संख्या १२४ असून, बाधित शेतकर्यांची संख्या ४४ हजार ९८६ इतकी आहे. एकूण बाधित क्षेत्र ४५ हजार ३६५.२८ हेटर आर असून, एकूण रुपये ३८ कोटी ५६ लाख १३ हजार १७९ रुपये अपेक्षीत निधी मंजूर झाला आहे.
अतिवृष्टीने शेतकर्यांची जमिनी खरडून गेल्याने पावसामुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई तातडीने मिळवून देण्याकरिता आमदार श्याम खोडे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले असून, शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा निधी मंजूर केला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्यांनी आपल्या बँक खात्याचे पासबुक तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याकडे तातडीने सादर करावे जेणेकरून दसर्यापूर्वी शेतकर्यांच्या खात्यात खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास मदत होईल, असे आवाहन आमदार श्याम खोडे यांनी केले आहे.