नागपूर :
मंगळवारी gold and silver सोन्या चांदीच्या दारात विक्रमी वाढ झाल्यानंतर बुधवारी सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. सणासुदीच्या हंगामात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर चांदीमध्येही प्रति किलो ८०० रुपयांची घसरण झाली आहे. यामध्ये जीएसटी व मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
gold and silver जीएसटीशिवाय सोने १,१४,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले तर, चांदी जीएसटीशिवाय १,३५,७००रुपयांवर उघडली. जीएसटीसह २४ सोन्याचा भाव यापेक्षा अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात सोने १० ग्रॅम जवळपास ११ हजार रुपयांनी महाग झाले आहे. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो १७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.