हनुमान मंदिर परिसराचा विकासासाठी निधी द्या

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
मानोरा,
Karkheda तालुयातील कारखेडा येथे आमदार सई प्रकाश डहाके ह्या एका भूमिपूजन कार्यक्रमाला आल्या असता स्थानिक महिलांच्या वतीने कारखेडा येथील हनुमान मंदिर परिसरात आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासंदर्भात लेखी निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली.
 

Karkheda 
कारखेडा येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये हनुमान मंदिर असून या मंदिरामध्ये गावातील भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शना निमित्त येत असतात. हनुमान मंदिर परिसरामध्ये सभागृह निर्माण करण्याची मागणी करणारे निवेदन भगिनींच्या वतीने आ. डहाके यांना देण्यात आले. मंदिर परिसराला सुरक्षा भिंत बांधण्यात यावी तथा मंदिर समोरच्या प्रांगणात सिमेंटचे गट्टू बसविण्यात येण्याची मागणी करण्यात आली असून, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व चिखलाचे साम्राज्य असल्याने येथे सौर प्रकाश योजना करण्यासंदर्भात आपल्या स्तरावर कारवाईचे निर्देश प्रशासनाला देण्याची विनंती सुद्धा निवेदनाद्वारा कारखेडा येथील महिलांच्या वतीने आमदार सई प्रकाश डहाके यांना करण्यात आली आहे. कारखेडा गावातील अनेक महिला आमदारांना मंदिर विकासासंदर्भात निवेदन देतेवेळी उपस्थित होत्या.