मुंबई,
Heavy rain warning in Vidarbha मराठवाडा आणि विदर्भातील आधीच संकटात असलेल्या भागांमध्ये पुढच्या पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः २७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या चक्रीय स्थितीमुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता विशेषतः जास्त राहणार आहे. हवामान खात्याच्या इशार्यानुसार, २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान मच्छिमारांनी समुद्रात जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या दुष्काळाचा फटका सहन केलेल्या मराठवाड्याला ओल्या दुष्काळानं ओलाचिंब केले आहे. इतका पाऊस पडल्याने काही भागांत पाणी नाकातोंडात पोहोचले असून जनजीवन ठप्प झाले आहे. धाराशीव, बीड, जालना या भागांत पावसाचं थैमान पाहायला मिळाले. ज्या काळात मराठवाड्याला दुष्काळात पाणी रेल्वेमार्फत पोहोचवावे लागले होते, तिथे आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. सांख्यिकी पाहता, मराठवाड्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १२४ टक्के पाऊस झाला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६०४ मिमी पाऊस पडतो, मात्र आतापर्यंत ७४७ मिमी इतका पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात १६५ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.
राज्य सरकारकडून पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना २,२१५ कोटींची मदत देण्यात आली असून, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसामुळे जनजीवन, वाहतूक, शेती आणि पाणी व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील आधीच संकटात असलेल्या भागांमध्ये पुढच्या पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः २७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या चक्रीय स्थितीमुळे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता विशेषतः जास्त राहणार आहे. हवामान खात्याच्या इशार्यानुसार, २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान मच्छिमारांनी समुद्रात जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या दुष्काळाचा फटका सहन केलेल्या मराठवाड्याला ओल्या दुष्काळानं ओलाचिंब केले आहे. इतका पाऊस पडल्याने काही भागांत पाणी नाकातोंडात पोहोचले असून जनजीवन ठप्प झाले आहे. धाराशीव, बीड, जालना या भागांत पावसाचं थैमान पाहायला मिळाले. ज्या काळात मराठवाड्याला दुष्काळात पाणी रेल्वेमार्फत पोहोचवावं लागलं होतं, तिथे आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे.
सांख्यिकी पाहता, मराठवाड्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १२४ टक्के पाऊस झाला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६०४ मिमी पाऊस पडतो, मात्र आतापर्यंत ७४७ मिमी इतका पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात १६५ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. राज्य सरकारकडून पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना २,२१५ कोटींची मदत देण्यात आली असून, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसामुळे जनजीवन, वाहतूक, शेती आणि पाणी व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.