हिंगणघाट,
income tax department raids आयकर विभागाच्या पथकाने शहरानजीकच्या सगुना फुड्स या सोयाबीन प्रक्रिया कंपनीत धडक दिली. संबंधित पथक नेमके कशासाठी या कंपनीत पोहोचले ही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून मोठी गुप्तता बाळगण्यात आली. येथून ४ किमी अंतरावर असलेल्या सगुना फुड्स कंपनीत आज २३ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भारत सरकार असे वाहनांवर लिहून असलेली काही वाहने धडकली.
संबंधित वाहनांनी आलेले व्यक्ती हे आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. संबंधित वाहने कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत गेल्यावर कुठलेही वाहने कंपनीत सोडण्यात आले नाही. तर कुठलेही वाहन कंपनीबाहेर निघाले नाही. इतकेच नव्हे तर कंपनीतील कामगारांनाही कंपनीतच थांबविण्यात आले होते.income tax department raids कंपनीच्या कार्यालयातील अधिका-यांसह कर्मचा-यांनाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. अधिकारी २० ते २५ च्या संख्येने होते. अधिकारी वृत लिहिसतोवर ठाण मांडून होते. हिंगणघाट पोलिसांनाही संबंधित अधिकारी सगुना कंपनीत कशासाठी आलेत याचीही माहिती नव्हती.