मां एकवीरा दुर्गोत्सवाची अनोखी कलाकृती

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
चित्रकूट पर्वतावरील वैष्णोदेवीचा आविष्कार

यवतमाळ : 
Maa Ekveera मां दुर्गा उत्सव मंडळ, सरस्वतीनगर, वडगाव रोड, यवतमाळ यांनी यावर्षी नवरात्रीच्या पावन पर्वावर एक अद्वितीय आणि भव्य देखावा साकारला आहे. या वर्षी मंडळाने चित्रकूट पर्वताचा देखावा उभारला असून पर्वताच्या मध्यभागी तेजोमय रूपात माता दुर्गा विराजमान झाल्या आहेत. हा देखावा जणू भक्तांना प्रत्यक्ष निसर्गरम्य चित्रकूट पर्वतावर घेऊन जातो. पर्वताची उंची, खडकाळ हिरवीगार जंगल, झरे आणि त्या रम्य वातावरणात विराजमान झालेली माता हे दर्शन पाहणार्‍याच्या मनात एक अद्भुत भक्तिभाव जागवते.
 
Maa Ekvira
 
Maa Ekveera मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतोनात कष्ट, कलात्मकता आणि कल्पकता यांचा संगम घडवून हा देखावा उभा केला आहे. मातेवरील श्रद्धा, भक्ती आणि निस्सीम प्रेम या भावनांचे मूर्त रूप म्हणजे हा भव्य देखावा होय. या वैशिष्ट्य म्हणजे चित्रकूट पर्वतामध्ये साकारलेले निसर्गरम्य वातावरण, देवी दुर्गेची तेजोमय मूर्ती, इच्छापूर्ती हुंडी, तसेच विस्तीर्ण मैदानात उभारलेला दिव्य देखावा आहे.भक्तांचे सहकार्य व योगदानातून हा उत्सव अधिकाधिक यशस्वी होईल, अशी मंडळाची श्रद्धा आहे. मातेच्या आशीर्वादाने हा उत्सव भक्तिभाव आणि उत्साहाने पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.