मयुरी ठोसर मृत्यूप्रकरणी बुलढाण्यात भव्य आक्रोश मोर्चा

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
बुलढाणा, 
mayuri thosars death जळगाव खान्देश येथील सुंदर मोती नगर येथे दि १० सप्टेंबर रोजी घडलेल्या अत्यंत दुःखद घटनेचा बुलढाणा शहरात समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला.या घटनेत २३ वर्षीय उच्चशिक्षित नवविवाहित मयुरी गौरव ठोसर हिने सासरच्या मंडळींकडून होणारा अमानुष जाच व छळ सहन न होऊन आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत घडलेली ही निर्दयी घटना समाजासाठी लाजिरवाणी असल्याचे उपस्थित समाजबांधवांनी ठामपणे नमूद केले. ही आत्महत्या नसून सासरच्यांनी घडवून आणलेली हत्या आहे.
 

मयुरी ठोसर  
 
 
दि. २३ सप्टेंबर रोजी शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाला युवासेनेचे मृत्युंजय संजय गायकवाड उपस्थित राहून समाजबांधवांना धीर दिला. त्यांनी या घटनेचा निषेध करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. माता-भगिनींच्या रक्षणाकरिता मी सदैव प्रत्येक समाजबांधवांसोबत खंबीरपणे उभा राहीन.mayuri thosars death आक्रोश मोर्चा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले यावेळी उज्जैनकर, राजू पाटील, श्रीकृष्ण शिंदे, श्रीकांत गायकवाड यांच्यासह महिलांसह असंख्य समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता.