बुलढाणा,
Murder of girlfriend in Buldhana बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरातील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री एक थरारक घटना घडली. हॉटेलच्या बंद खोलीत २१ वर्षीय युवती पायल पवार आणि तिचा २३ वर्षीय प्रियकर सोनू उर्फ साहिल राजपूत यांचा मृतदेह आढळला. प्राप्त माहितीनुसार, प्रेमीयुगोलामध्ये सुरू असलेल्या वादातून प्रियकराने आधी प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि तिचा खून केल्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्या केली.
दोघेही साखरखेर्डा गावातील असून, मागील तीन ते चार वर्षांपासून त्यांचा प्रेमसंबंध होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनेच्या बातम्या पसरताच हॉटेल परिसरात मोठा जमाव जमा झाला. Murder of girlfriend in Buldhana नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आणि एसआरपीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी तपासानुसार प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या केली व स्वतःचीही हत्या केली. मृतदेहांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या थरारक घटनेने खामगाव शहर हादरले असून, पोलिस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.