विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांची माहिती
विभागीय रेल्वे समितीची बैठक
नागपूर :
Nagpur Railway नागपूर ते पूणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर आता प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. आगामी काळात नागपूर मार्गे काही नव्या गाडया धावणार असल्याने तिसरी व चौथी मार्गिकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिल्या जात असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली. विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) अमोल कुमार पिंगळे, अतिरिक्त विभागीय रेल्वे अरुण कुमार सिंह, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन पाटील तसेच शाखाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सदस्यांनी काही महत्वाच्या सुचना केल्या. रेल्वे प्रशासनाने सर्व सुचनाची नोंद घेतली असून विविध कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत Nagpur Railway नागपूर, छिंदवाडा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आदी विविध भागांतील मान्यवर सदस्य होते. यात सुनील जेजानी, डॉ. मिलिंद डंभारे, प्रतीक शुक्ला, रमेश जिचकार, गणेश सैंदाने, सत्यब्रत पटनायक, सुरेश पट्टेवार, सुरेश डोंगे, नितीन तिंखेडे, प्रविण शिंदे, हेमंत बर्डे, सतीश यादव आदींचा समावेश होता.
मध्यवर्ती नागपूर विभाग महत्त्वाचा
Nagpur Railway बैठकीची सुरुवात वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अमन मित्तल यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी नागपूर विभागाच्या आढावा घेतला तसेच प्रवासी सुविधा सुधारण्यासाठी समिती सदस्यांनी दिलेल्या मोलाच्या सूचनेप्रमाणे विविध विकास कामे होणार असल्याचे आश्वासन दिले. विनायक गर्ग यांनी सांगितले की भारतीय रेल्वेतील मध्यवर्ती नागपूर विभाग हा एक महत्त्वाचा विभाग असल्याने प्रवासी अधिक लक्ष दिल्या जात आहे. येथून चारही दिशेने रेल्वे धावत असल्यामुळे पूर्व, पश्चिम व उत्तर—दक्षिणेला धावणार्या रेल्वे गाडयांकडे लक्ष द्यावे लागते. याशिवाय मालवाहतूक क्षेत्रात नागपूर विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण असून रेल्वेच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असतो.