नंदूरबार,
Protest turns violent in Nandurbar नंदूरबार शहरात काही दिवसांपूर्वी दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या तरुणाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सुरुवातीला मोर्चा शांततेत चालत असला तरी, काही उपद्रवींनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली आणि पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे मोर्चात सहभागी नागरिकांमध्ये सैरावैरा व गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराचा वापर केला.

घटनेत एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी जखमी झाल्या आहेत. मारहाणीच्या घटनेतील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जय वळवी यावर सूर्यकांत मराठे या Protest turns violent in Nandurbar आरोपीने चाकू हल्ला केला होता, आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आदिवासी संघटना न्यायालयात खटला लवकर चालवावा आणि आरोपींना कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करत आहे. याच मागणीसाठी आयोजित मोर्चात काही आंदोलक आक्रमक झाले आणि दगडफेक केली, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.