अखेर साहेबांनी सांगितलं, अन् रोहित्र झाडा झुडपातून मोकळं झालं

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
घोराड,
wardha news गत काही महिन्यांपासून शेत शिवारातील एक रोहित्र झाडा झुडपाच्या विळख्यात सापडले होते. त्या रोहोत्राची सुटका कधी होईल याची प्रतीक्षा होती. आज २३ रोजी तरुण भारतमधून ‘सांगा साहेब या रोहित्राची दुरुस्ती कशी करायची?’ या मथळ्याचे वृत्त प्रकाशीत झाले. पण अखेर मंगळवारी सकाळी आणि चक ११ वाजता त्या रोहित्राने मोकळा श्वास घेतला.
 
 

रोहित्र  
 
 
जाखाळा शिवारातील रोहीत्र झुडपाच्या विळख्यात होते. या बाबत सांगा साहेब, या रोहित्राची दुरस्ती कशी करायची या मथळ्याचे वृत्त तरुण भारतमध्ये प्रकाशित होताच वीज वितरण कार्यालय समोर कर्मचार्‍यांत चर्चा सुरू झाली अन् तत्काळ झाडे झुडपे कापणार्‍यांचा शोध घेतला गेला.wardha news सकाळी ११ वाजतापासून या रोहित्रा सभोवतालची झाडे झुडपे कापण्यात आली. वेली वाढल्या त्या कापण्याचे काम दुपारी ३ वाजेपर्यंत सुरूच होते. अखेर साहेबांना त्या रोहित्रा सभोवतालची झुडपे कपण्यास पुढाकार घ्यावा लागला मग बातमीची प्रतीक्षा होती का असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला हे तेवढेच खरे.