तणावरहीत जीवनासाठी दिनचर्या आणि जीवनशैली आदर्श असावी : डॉ. उपाध्याय

*श्यामसुंदर अग्रवाल व्याख्यानमाला

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
देवळी,
dr upadhyay धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात तणाव पुर्णपणे काढून टाकणे शय नसले तरी तणावाशी सामना करण्याची क्षमता निश्चितपणे वाढवता येते. त्यासाठी नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तणावरहीत जीवन जगणे शय होऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी दररोज ध्यान, योगासने, प्राणायाम यांचा नियमित सराव आवश्यक आहे. यासह पुरेशी झोप, संतुलीत आहार तसेच नकारात्मक विचार टाळणे यामुळे मानसिक स्वास्थ सुधारते. तणावरहीत जीवन जगण्यासाठी आपली दिनचर्या आणि जीवनशैली आदर्श असली पाहिजे, असे विचार माजी पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यत केले.
 
 
 
drupadhey
 
 
श्यामसुंदर मन्नालाल अग्रवाल धर्मशाळेच्या सभागृहात स्व. श्यामसुंदर अग्रवाल स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यान मालेत तणावरहीत जीवन कसे जगावे या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. रामदास तडस होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत उद्गीरकर, ज्येष्ठ समाजसेवी मोहन अग्रवाल, डॉ. गणेश मालधुरे, इमरान राही उपस्थित होते. यावेळी रामदास तडस यांनी, जीवनात सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवणे आणि इतरांशी आदरपूर्वक वागणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
संचालन ज्ञानेश्वर काळे तर आभार प्रदर्शन मोहन अग्रवाल यांनी केले.dr upadhyay यावेळी श्यामसुंदर अग्रवाल यांच्या जीवनाबाबत माहिती देऊन राहुल चोपडा यांनी श्रद्धांजली वाहिली. मान्यवरांच्या हस्ते देवळी शहरातून शालान्त व उच्च माध्यमिक परीक्षेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना श्रीमती गायत्रीदेवी मोहनलाल अग्रवाल स्मृती पारितोषिक, रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला प्रदीप दाते, मुरलीधर बेलखोडे, विजय सत्यम, मोहन मोहिते, मोहन गुजकर, विजय नाखले, जब्बार तंवर, सुरेश वैद्य, डॉ. मदनकर, महेश मोकलकर, नंदू वैद्य, सुधाकर सुरकार, राजू लभाणे, शरद नाईक, चेतन अग्रवाल, रेखा पारेख, दीपक सेठीया, पोलिस निरीक्षक अमोल मांडालकर, आदी उपस्थित होते.