सांगली
sambhaji bhide शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने सांगलीत आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून वर्तुळात खळबळ उडवली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात भिडेंनी थेट भारतीय संविधानावर तसेच देशाच्या इतिहासावर आणि सध्याच्या सामाजिक प्रथांवर कठोर शब्दांत टीका केली.“कसलं संविधान बोलता?” असा सवाल उपस्थित करत भिडे म्हणाले, “जगात १८७ देश आहेत. आपली लायकी काय, तर ती त्या संविधानात! विद्वान लोक पोटात मुरड आल्यासारखे 'संविधान, संविधान' म्हणतात. कसलं संविधान बोलता?” अशा शब्दांत त्यांनी संविधानाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने कार्यक्रमात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भाष्य करताना भिडे म्हणाले, “१३०० वर्षे मुस्लिम आणि युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला हा देश आहे. ज्यांना गुलामीची लाज वाटत नाही, तो निर्लज्ज लोकांचा देश आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये काहीसं अस्वस्थ वातावरण निर्माण झालं.
कार्यक्रमात sambhaji bhide संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. “शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेले नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली होती. आजही आम्ही फक्त स्वराज्य नव्हे, तर हिंदवी स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत,” असे ते म्हणाले.यावेळी नवरात्रोत्सवात साजऱ्या होणाऱ्या दांडिया कार्यक्रमावरही भिडेंनी कठोर टीका केली. “गणपती आणि नवरात्र उत्सवात दांडिया खेळून वाटोळं झालं आहे. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे,” असे म्हणत त्यांनी सध्या प्रचलित असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरही प्रश्न उपस्थित केला.या वादग्रस्त विधानांमुळे सांगलीतील हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भिडे यांची विधाने अनेकदा वाद निर्माण करणारी ठरली असली तरी त्यांच्या अनुयायांमध्ये मात्र अजूनही त्यांना प्रचंड पाठिंबा दिसून येतो. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय व सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.