सावंगी येथे कार-दुचाकीचा अपघात

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Car-Two-Wheeler Accident : सावंगी परिसरात पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा कहर समोर आला आहे. आज बुधवार, २४ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मारुती मंदिराजवळ भरधाव कारने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर तर दोन जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सावंगीकडून भरधाव येणारी कार मारुती मंदिराजवळ पोहोचताच समोरून येणार्‍या दुचाकीवर जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीस्वार रस्त्यावर दूर फेकला गेला. या अपघातात दुचाकी चालकाच्या शरीरावर गंभीर दुखापत झाली.
 
 

KL 
 
 
 
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना सांभाळून लगेच रुग्णवाहिकेला कळविले. मात्र जखमी गंभीर असल्याचे पाहता, तेवढ्या वेळेतच एका ऑटोचालकाने माणुसकी दाखवत जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले.
 
 
अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वृत्त लिहीपर्यंत जखमींची नावं कळू शकली नाहीत. मात्र दुचाकीचालक गंभीर असून त्याच्यासोबत असलेलाही प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.