मानोरा,
Sevadas Nagar farm road issue, तालुयातील बळीराजाची अवस्था धो-धो कोसळणार्या पावसाने बिकट करून ठेवलेली असताना आपल्या शेतशिवारामध्ये असलेले खरीप हंगामातील पीक घरापर्यंत गुडघाभर चिखलाने माखलेल्या पांदण रस्त्याने कसे आणावे अशी चिंता सेवादास नगर तांड्यातील शेतकर्यांना मागील अनेक वर्षांपासून सतावत असून, यावर्षी सुद्धा या त्रासदायक रस्त्यांची समस्या शेतकर्यांपुढे आ वासून उभी आहे. धो धो कोसळणार्या पावसामुळे सोयाबीन व तुरीचे पीक हातातून गेल्यात जमा असल्याची परिस्थिती मानोरा तालुयातील सहा ही मंडळामध्ये सध्या उद्भवलेली आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरे जात जे काही थोडे थोडे खरीप हंगामातील पीक शेतकर्यांच्या हाती लागेल ती कृषी संपदा घरापर्यंत कशी आणावी अशी विवंचना रस्त्यांना अभावी तालुयातील अनेक गावातील शेतकर्यांची मागील अनेक वर्षांपासून कायम आहे.
सेवादास नगर तांड्यातील शेतकरी अमोल राठोड यांचा शेतापासून तर डोमसिंग चव्हाण यांच्या शेतापर्यंत जवळपास दोन किमी अंतर असलेला पांदण रस्ता देखभाल व दुरुस्ती अभावी पूर्णपणे चिखलमय झालेला आहे.स्थानिक राहुल राठोड या शेतकर्यांच्या शेतापासून तर यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील ब्रह्मनाथ या गावापर्यंतच्या जवळपास दोन किमी पांदण रस्त्याची अवस्था सुद्धा पूर्णपणे लयास गेलेली असून वाहने तर सोडा बैलगाडी अथवा पायी जाणे सुद्धा चिखलामुळे मोठे जिकरीचे झालेले आहे. सेवादास नगर तांड्या मधील शेतकर्यांचे जीवन यापण पूर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने उपरोक्त दोन्ही पांदण रस्ते शासन स्तरावर प्राधान्याने मंजूर करून प्रशासनाकडून तातडीने या पांदण रस्त्यांची निर्मिती करून शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी स्थानिक सरपंच वंदना नेमीचंद राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.