दुचाकीवर बच्चा अन् एसपींचा शहरात फेरफटका

* नवरात्रात शहरात तगडा बंदोबस्त

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Navratri 2025 : गेल्या पाच दिवसांपासुन वर्धा शहरातील चौकाचौकात पोलिस आणि गृह रक्षक दलाचे पोलिस तैनात आहेत. दुर्गादेवीची स्थापना झाल्यानंतर मंडपाजवळही पोलिसांचा बंदोबस्त आहे. शहरातील देवीभतांना पोलिसांकडे पाहून आपण सुरक्षित असल्याचा भास होत असतानाच काल मंगळवारी रात्री पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी लहान मुलाला सोबत घेत चक शहरात फेरफटका मारला. सामान्य व्यती प्रमाणे फिरत असल्याने त्यांना अनेकांनी ओळखलेही नाही. परंतु, त्यांनी यानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेवर नजर टाकली. आज २४ रोजी सायंकाळी जैन दाम्पत्यांनी राम दरबार येथील दुर्गादेवी मंडळात आरतीलाही हजेरी लावली.
 
 
 
J
 
 
 
शहरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून नागरिकही देवींचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडत असल्याने सायंकाळ होताच रस्ते गर्दीने फुलून जातात. काही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाने तगडा बंदोबस्त केला आहे. एवढे असूनही नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा कुठे काही अनूचित प्रकार घडू शकतो का यावर नजर ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी चक मंगळवार २३ रोजी सिव्हिल ड्रेसवर फेटका मारला.
 
 
वर्धेतील नवरात्रोत्सवात शहरातील व्यापारी एकत्रित येत असल्याने विदर्भात प्रसिद्ध आहे. व्यापार्‍यांतर्फे मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतील प्रत्येक ओळीत दुर्गा देवीची स्थापना केली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात बाजारपेठत रात्री उशिरापर्यंत पाय ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही. या गर्दीचा फायदा घेत चोरटेसुद्धा सक्रिय होतात. दरवर्षी चेन स्नेचिंग, पाकिटमार आदी घटना हमखास घडतात. शहरात आजपर्यंत युवतींसोबतचे अनुचित प्रकार शहरात घडले नाहीत. परंतु, ते होऊच नये यासाठी पोलिस प्रशासन खबरदारी घेत असताना पोलिस विभागाने आधीच चोख बंदोबस्त केला आहे.
 
 
ठिकठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन केल्याने रात्री उशिरापर्यंत युवती-महिलांची रस्त्याने वर्दळ राहणार आहे. या सर्वांवर पोलिसांचे लक्ष आहे की नाही. याची खबर घेण्यासाठी शासकीय वाहनांचा उपयोग न करता पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी सीव्हील ड्रेस परिधान करून एम. पी. ०४ - एम. डब्ल्यू. ०७६८ क्रमांकाच्या दुचाकीने बाजारपेठ अनेक मंडळात फेरफटका मारला. एसपींना सिव्हील ड्रेसवर पाहून पोलिस कर्मर्‍यांची भंबेरी उडली.