तालुक्यातील Vasant Cooperative Sugar Factory वसंत सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगाराचे थकीत पगार वारंवार मागूनही मिळत नसल्याने अखेर बुधवार, २४ सप्टेंबरपासून अवसायकांच्या कार्यालयासमोर कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. सर्व कामगारांचे पगार थकीत असून कामगारांना अद्याप मिळालेले नाही. अमरावती प्रादेशिक सहसंचालकांसमोर ५ ऑक्टोबर २०२१ रोजी कारखान्याला मिळणार्या भाडेपट्ट्याच्या रकमेतून टक्के रक्कम कामगारांना थकीत पगार व इतर देणी देण्याबाबत निर्णय झाला आहे.
Vasant Cooperative Sugar Factory आतापर्यंत कामगारांना एकूण ६ कोटी रुपये पगार व इतर देणे थकीत आहे. ही रक्कम मिळावी म्हणून संघटनेने अनेक वेळा मागणी केलेली आहे. परंतु अद्यापही या रकमेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. म्हणून कामगारांच्या सभेत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार, २४ सप्टेंबरच्या दुपारी १२ पासून अवसायकांच्या कार्यालयासमोर कामगार उपोषणास बसले आहेत. वसंत साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष मुडे, सरचिटणीस कॉम‘ेड विनोद शिंदे उपोषणाचे नेतृत्व करीत आहेत.