नागपूर,
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे नुकत्याच पार पडलेल्या volleyball tournament व्हॉलीबॉल स्पर्धेत मॉन्टफोर्ट शाळेचे विजेतेपद प्राप्त केले. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुला व मुलींमध्ये घेण्यात आली. काटोलच्या बनारसीदास रूईयाच्या प्रांगणात या स्पर्धा घेण्यात आल्या. मॉन्टफोर्टने काटोल १५-११, १३-१५, १५-१३ अशा तीन सेटमध्ये पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. मॉन्टफोर्टने नरखेड व कळमेश्वर यांच्यात झालेल्या सामन्यातून सरळ अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
volleyball tournament या शाळेतील पार्थ तोडकर, शर्विल नारनवरे, भावेश पराते, मयंक चौधरी, पार्थ ढेंगे व अर्णव पडोले तसेच मुलींमध्ये अमेया राव, वंशिका लांडगे, इशिका वंजारी, अद्वैता कोरे, पाखी जीविका तेलरांधे या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी केली. दोन्ही संघ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत नागपूरचे प्रतिनिधित्व करणार आहे. शाळेच्या या यशाबद्दल प्राचार्य जोमोन जॉय, उपप्राचार्य जोस ईमानुयल व क्रीडा विभाग प्रमुख सुरेंद्र उगले यांनी दोन्ही संघाचे अभिनंदन केले आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षका उषा डूडी तसेच प्रशिक्षक योगेश राव दिले आहे.