खून प्रकरणी आरोपीस दंडासह आजीवन कारावास

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Murder Case : येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्धा तथा अतिरित सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी खून प्रकरणातील आरोपी भगवंत वलके (३३) रा. वर्धमनेरी ता. आर्वी याला आजीवन सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरित ३ महिन्यांच्या सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली आहे.
 
 
 
H
 
 
 
सुखदेव व भगवंत हे दोघेही जंगलातून मोळी आणण्याचे काम करीत होते. घटनेच्या एक महिण्यापूर्वी सुखदेव व भगवंत यांच्यात वाद झाला होता. भगवंतने सुखदेव याची कुर्‍हाड चोरली होती. याच कारणामुळे भगवंतला सुखदेव याने लोकांसमोर चोप दिला होता. त्यामुळे भगवंतच्या मनात सुखदेवबाबत द्बेष होता. शिवाय तो मद्यधुंद अवस्थेत असल्यावर सुखदेवला जीवानिशी ठार करेल असे नेहमीच म्हणत होता. १७ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास सुखदेव हा घरी दारात झोपून असताना सुखदेवच्या डोयावर वार करून भगवंतने त्याला ठार केले. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यावर तळेगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक धीरज राजूरकर यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. अतिरित सरकारी अभियोता विनय घुडे यांनी शासकीय बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून रोहिदास खेडकर यांनी काम पाहिले.