२० पोलिस अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी अटॅच

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Wardha News : पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी वर्ध्यातील संवेदनशील मानल्या जाणार्‍या रामनगर पोलिस ठाण्यातील २० अधिकारी व कर्मचार्‍यांना एका गंभीर प्रकरणी दखल घेत तडकाफडकी मुख्यालयी अटॅच केले आहे. २३ रोजी उशिरा संबंधित आदेश धडकताच एकच खळबळ उडाली.
 
 
 
POLICE
 
 
 
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका दारू विक्रेत्याशी हातमिळवणी करून त्याला पाठबळ दिल्या जात असल्याचा आणि कर्तव्यात हयगय केल्याचा आरोप पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर आहे.
 
 
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार रामनगर पोलिस ठाण्यातील एक ग्रेड उपनिरीक्षक, २ सहाय्यक फौजदार, ६ पोलिस हवालदार आणि ११ पोलिस शिपायांचा समावेश आहे. यापैकी १३ जण गुन्हे शोध पथक तर ७ जण बीट सांभाळत होते. अधिकारी व कर्मचार्‍यांची पोलिस अधीक्षकांनी चांगलीच कानउघाडणी करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिल्याचे वृत्त आहे.