खान व खनिजे नियामक परिषदेची स्थापना

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Wardha News : केंद्र सरकारच्या खान मंत्रालयाने खान व खनिजे अधिनियम १९५७ मध्ये सुधारणा करून खान व खनिजे सुधारणा आणि अधिनियम २०१५ नुसार अधिसूचना जाहीर करून वर्धा जिल्हा खनिज प्रतिष्ठानअंतर्गत परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेअंतर्गत नामनिर्देशित पदसिद्ध सदस्यांच्या नियुतीकरिता जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठानअंतर्गत नियामक परिषद कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
 
 
 
JK L
 
 
 
यामध्ये उर्जा उद्योग कामगार व खनिकर्म विभागाने काढलेल्या २४ सप्टेंबरच्या अधिसुचनेनुसार जिल्हाधिकारी पदसिद्ध अधिकारी असून खासदार अमर काळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, विधान परिषद सदस्य दादाराव केचे, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, आ. समीर कुणावार हे सदस्य आहेत. तसेच पदसिद्ध सदस्यांमध्ये जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील खानबाधित क्षेत्र संबंधित, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासनिक प्रमुख, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा आदिवासी विकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. चे कार्यकारी अभियंता, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.