दक्षिणेची वैष्णवदेवी महाकाली धामतीर्थ येथे भाविकांची मांदियाळी

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Wardha News : दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थ, महाकाली येथे नवरात्रीनिमित्त जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली आहे. येथेे नवरात्रानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
JKJ
 
 
 
महाकाली येथे होम, हवन, पूजा, अर्चा करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थाचे पौराणिक महत्त्व आहे. ही जागा आदिवासी महिलांनी शोधून काढली आणि बाबा कुमरे यांनी आयुष्यभर आईची सेवा केली. महाकाली प्रकल्पाच्या उभारणीनंतर माता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे मंदिर (धाम धरण) पाण्यात बुडाले होते. आईने माई भत पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या स्वप्नात येऊन डोहावाले बाबाच्या मंदिराजवळील महाकाली मंदिर पुन्हा बांधण्याचे आदेश दिले. त्यानुसार या ठिकाणी माता महाकालीचे भव्य मंदिर उभारण्यात आले. प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, नवरात्रात माता महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची पूजा अष्टांग योगासह केली जाते.
 
 
या ठिकाणी जय महाकाली सेवा मंडळाच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, निःशुल्क भोजन, पार्किंग, प्रसाधन गृहे, भतांचे उन्ह व पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी दर्शन भागात टीनाचे शेड यांचा समावेश आहे. क वर्ग दर्जा असलेले देवस्थान असूनही शासनाद्वारे अद्याप या ठिकाणाचा विकास करण्यात आलेला नाही. हे ठिकाण विकासापासून उपेक्षितच आहे. त्यामुळे शासनाने या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी माई भतांनी केली आहे.