ओल्या दुष्काळसाठी उबाठा शिवसेनेचे आंदोलन

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
बाभुळगाव तहसील कार्यालयावर धडक

बाभुळगाव, 
Wet Drought Maharashtra  : यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकर्‍यांना सरसकट अनुदान जाहीर शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी करा, या मागण्यांसाठी उबाठा शिवसेनेच्या वतीने मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी डफडे आंदोलन करण्यात आले. तालुकाप्रमुख गजानन पांडे, संघटक सागर धवणे, माजी तालुकाप्रमुख भानुदास राऊत, शहरप्रमुख सचिन माटोडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तहसील कार्यालयावर धडक देवून निवेदन सादर केले.
 

Ola Duskal 
 
उबाठा शिवसेनेच्या वतीने बाभुळगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. तसेच संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे शेतीची अतोनात हानी झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात Wet Drought Maharashtra :  ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान शेतकर्‍यांना तातडीने देण्यात यावे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकर्‍यांचे शेती नुकसानाचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी, या संबंधीचा शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
 
 
Wet Drought Maharashtra :  नायब तहसीलदार यामीन सय्यद यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात जनार्दन झाटे, दिलीप गावंडे, रामेश्वर पेरकुंडे, गजानन कोळणकर, शैलेश भगत, अजय जुमनाके, संघपाल खंडेराव, भूषण कडे, योगेश कवडे, मो. साबीर, रामचंद्र जांभळे, अनिल गावंडे, सतीश घोडे, दिनेश इंगळे, प्रवीण काळे, दयाल अराठे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.