शहरातील 50 टक्के वाहनांना लागली नवीन नंबर प्लेट

नंबर प्लेट बसविण्याचा वेग वाढला

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,

High Security Registration Plate प्रत्येक वाहनाला उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य करण्यात आले असून नवीन नंबर प्लेटच्या ऑनलाईन नाेंदणीचा वेग झपाट्याने वाढला आहे. आतापर्यंत शहरातील 50 टक्के वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लागल्याचा दावा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने (आरटीओ) केला आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत नागपुरातील 90 टक्के वाहनांना नवी नंबर प्लेट लागण्याची आशा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 

 High Security Registration Plate  
उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट लावण्यासाठी ऑनलाईन नाेंदणी करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने माेठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हेगारांवर नियंत्रण मिळावे, यासाठी एचएसआरपी प्रत्येक वाहनांवर लावण्यात येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यांपासून एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याचे काम राज्यभर सुरु आहे. राज्यात 2 काेटी 10 लाख वाहने आहेत. आतापर्यंत केवळ 50 टक्के वाहनांची ऑनलाईन नाेंदणी झाल्याचा दावा प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आला आहे. सुरुवातीला ऑनलाईन नाेंदणीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. यादरम्यान, आरटीओ कार्यालयातील दलालांनी नागरिकांच्या अज्ञानाचा ायदा घेऊन तसेच नाेंदणीची ारच किचकट प्रक्रिया असल्याचा ार्स करुन अतिरिक्त पैसे उकळले हाेते. अशा तक्रारींची आरटीओ कार्यालयाने दखल घेतली. सध्या नाेंदणी प्रक्रिया आणि िफटमेंट प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यात आली आहे. आरटीओ विभागाने वेळाेवेळी गांभीर्य दाखविल्यामुळेच आतापर्यंत जवळपास 50 टक्के वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात आले आहे. येत्या दिवाळीदरम्यान, जवळपास 90 टक्के वाहनांना नवीन नंबर प्लेट लागलेली असेल. नागरिकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रादेशिक परिवहन विभागाला यश आल्याचा दावा आरटीओकडून करण्यात आला आहे.
 
 
 

30 नाेव्हेंबर शेवटची मुदत
 
 
2019 पूर्वी नाेंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत चारदा मुदत वाढविल्यानंतर 30 नाेव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर ज्यांच्या वाहनावर उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट नसेल अशा वाहनांवर 2 ते 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई वायुवेगार्माफत करण्यात येणार आहे.
आतापर्यंतची एचएसआरपीची आकडेवारी

एमएच 49 (पूर्व)                            एमएच 31 (शहर)         ग्रामीण

नाेंदणी - 2,01569                                                             1,91,739                       2,45,921    

अपाॅईंटमेंट - 1,86,868                                                        1,80,116                    1,92,815

फिटमेंट पूर्ण -1,64,9681                                                     1,56,902                   95,856

 
 
सध्या नवीन नंबर प्लेट लावण्याचा वेग वाढला आहे. अनेकांना या बदलाला सकारात्मक घेतले आहे. वाहनचालकांनी वाहनांची ऑनलाईन नाेंदणी करावी. अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी लागेल.
- -किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर)