आकांक्षा प्रकाशनाची लिहित्यांची राज्यस्तरीय सहावी कार्यशाळा

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Akanksha Prakashan : आकांक्षा प्रकाशनच्या वतीने राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा सेवाग्राम कुटी येथे १ व २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय लिहित्यांच्या कार्यशाळेला ज्येष्ठ समीक्षक व अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे अध्यक्षपद भुषवणार आहेत. तर उद्घाटक म्हणून बाईमाणूसकार करुणा गोखले, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे असतील.
 

l 
 
 
 
या कार्यशाळेमध्ये लिहिणार्‍याना चालना मिळावी, जे लिहिते त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही कार्यशाळा गेल्या अनेक वर्षापासून आकांक्षा प्रकाशनने सुरू केलेली आहे. यापूर्वी लेखिका निरजा, ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार, उर्मिला पवार, डॉ. यशवंत मनोहर अशा ज्येष्ठ लेखकांनी अध्यक्षपद भूषाविले आहे. यावर्षीच्या कार्यशाळेमध्ये करुणा गोखले आणि डॉ. अक्षयकुमार काळे हे एक विशेष आकर्षण आहे.
 
 
या वेगवेगळ्या विषयांवर चर्चेची चंगळ राहणार असल्याची माहिती आयोजक आणि आकांक्षा प्रकाशनच्या सर्वेसर्वा अरुणा सबाने यांनी दिली आहे.