लागोपाठ दुसरी अमृत भारत एसप्रेस वर्धा रेल्वे स्थानकावरून धावणार

*मध्य रेल्वे समितीचे सदस्य प्रणव जोशी यांची माहिती

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
Amrit Bharat Express : भारतीय रेल्वेने ब्रह्मपूर (ओडिशा) आणि उधना (सुरत) यांना जोडणारी नवीन साप्ताहिक अमृत भारत एसप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन २७ सप्टेंबर रोजी ब्रह्मपूरहून विशेष सेवा सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे झेडआरयूसीसीचे सदस्य प्रणव जोशी यांनी दिली.
 
 
 
RAILWAY
 
 
 
सेवाग्राम मार्गे धावणारी जोगबनी-इरोड अमृत भारत एसप्रेस (ट्रेन क्र. १६६०१/१६६०२) ही आधीच आठवड्यातून दोन वेळा (गुरुवार/रविवार) उपलब्ध आहे. वर्धा मुख्य रेल्वे स्थानक येथून धावणारी ही दुसर्‍या प्रकारची रेल्वे वर्धेकरांना उपलब्ध असेल, ज्यामुळे आरक्षित नसलेल्या प्रवासाला प्राधान्य देणार्‍या हजारो प्रवाशांना फायदा होईल.
 
 
या नियमित सेवेचे नाव १९०२१/१९०२२ ब्रह्मपूर-उधना-ब्रह्मपूर साप्ताहिक अमृत भारत एसप्रेस असे आहे. ट्रेन क्र. १९०२१ दर रविवारी सकाळी ७.४० वाजता उधनाहून (सुरत) सुटेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्र. १९०२२ दर सोमवारी रात्री ११.४५ वाजता ब्रह्मपूरहून निघेल आणि बुधवारी सकाळी ०८:.५ वाजता उधना येथे पोहोचेल. दर रविवारी सायंकाळी ५.४८ वाजता वर्धा जंशन येथे पोहोचेल तर ब्रह्मपूरहून निघालेली रेल्वे दर मंगळवारी रात्री ८.५८ वाजता वर्धा जंशन येथे पोहोचेल.
 
 
या ट्रेनमध्ये २२ आधुनिक एलएचबी (ङकइ) अमृत भारत कोच असतील. त्यात ८ स्लीपर लास, ११ जनरल सेकंड लास, १ पॅन्ट्री कार आणि २ एसएलआर कोच यांचा समावेश आहे. ही सेवा ओडिसा, छत्तीसगड, विदर्भ आणि गुजरातमधील प्रमुख शहरांना जोडताना प्रवाशांना परवडणारा प्रवास उपलब्ध करून देईल.
 
 
नवीन अमृत भारत ट्रेन वर्धा आणि विदर्भातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा आहे. ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायक, वेळेची बचत करणारी व सर्वांना परवडणारी असल्याचे प्रणव जोशी यांनी सांगितले. नवीन रेल्वे सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस यांचे जोशी यांनी आभार मानले.