सामान्य श्रेणीतील प्रवाशांना पहिल्यांदाच परवडणारी सेवा

-अमृत एक्सप्रेस नागपूर मार्गे धावणार -नव्या रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखविणार

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
नागपूर,
Amrit Express-Nagpur : मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी सेवा आणि उच्च दर्जाचा प्रवास अनुभव देण्यासाठी रेल्वेने आता लांब पल्ल्याच्या अमृत भारत एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हाय-स्पीड अमृत भारत एक्सप्रेस ही ट्रेन ओडिसा ते गुजरातला जोडत असून या प्रामुख्याने रायपूर, भिलाई, दुर्ग, गोंदिया आणि नागपूर सारख्या मध्यवर्ती स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. अमृत भारत एक्सप्रेस २७ सप्टेंबर पासून धावणार असून यामुळे सामान्य श्रेणीतील प्रवाशांना पहिल्यांदाच परवडणारी सेवा मिळणार आहे.
 
amrit-bharat-express-.
 
 
 
दसर्‍यापूर्वीच मिळाले गिफ्ट
 
 
भारतीय रेल्वे प्रवाशांना परवडणार्‍या आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देऊन दसर्‍यापूर्वीच एक गिफ्ट देण्यात आले आहे. सुरतच्या उधना रेल्वे स्थानकापासून ओडिशाच्या ब्रह्मपूर रेल्वे स्थानकापर्यंत अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. यात प्रामुख्याने विशेषत: राज्यातील नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया या स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन करणार आहेत.
 
उच्च दर्जाचा प्रवास अनुभव
 
 
रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया हँडलवर नवीन अमृत भारत एक्सप्रेसची माहिती दिली आहे. मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना परवडणारी सेवा आणि उच्च दर्जाचा प्रवास अनुभव अमृत भारत एक्सप्रेसमध्ये मिळणार असल्याचा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.
 
 
एक कोच अपंग प्रवाशांसाठी राखीव
 
 
ही ट्रेन ताशी १६० ते १८० धावणार असून एकूण २२ कोच असलेल्या या ट्रेनला ११ सामान्य श्रेणीचे कोच, ८ स्लीपर श्रेणीचे कोच, १ पेंट्री कार आणि २ द्वितीय श्रेणीचे कोच असतील. याव्यतिरिक्त एक कोच अपंग प्रवाशांसाठी राखीव असेल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होत असल्याने सुट्टीच्या हंगामात या ट्रेनमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आणि थेट कनेक्टिव्हिटीचा आनंद मिळणार आहे.