गुप्तांगात बेलन घालून ऑटोचालकावर क्रूरता

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
फाजिल्का, 
auto-driver-brutally-beaten फाजिल्का येथे एका ऑटोचालकावर अत्यंत अमानुष प्रकार घडला आहे. पीडित चंद्रप्रकाश या व्यक्तीवर एका महिलेने आणि तिच्या मुलाने क्रूर वागणूक दिली असून, सध्या तो सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे.

auto-driver-brutally-beaten
पीडिताचा आरोप आहे की, आरोपी महिला आणि तिच्या मुलाने त्याला घरात बोलावून घेतले व खोलीत बंद केले. त्यानंतर त्याच्यावर शारीरिक छळ केला आणि त्याच्या गुप्तांगात लाकडी बेलन घातले. यातून तो वेदनेने आक्रोश करत असताना, आरोपींनी साडेआठ मिनिटांचा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ऑटोयुनियनचे अध्यक्ष अमरीक सिंह यांनी सांगितले की, पीडित ऑटोचालकाची त्या महिलेशी आधीपासून ओळख होती. दोघांमध्ये बराच काळ संपर्क होता. मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने चंद्रप्रकाशला रुग्णालयात दाखल करावे लागले. auto-driver-brutally-beaten यानंतर व्हिडिओ समोर येताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सध्या पोलिस पीडित ऑटोचालकाचा जबाब नोंदवत आहेत. त्याच्या जबाबाच्या आधारे पुढील गुन्हा दाखल करून आरोपी आई-मुलावर कारवाई केली जाणार आहे.