बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा!

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
बुलढाणा, 
Banjara Samaj-Elgar Morcha : हैदराबाद सेंट्रल प्रोविन्स अँड बेरारच्या गॅजेट तसेच १९५६ च्या करारनाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला तात्काळ न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात याव्यात, या इतर मागण्यासाठी दि. २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
 
 
bul
 
 
 
येथील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर आयोजित जाहिर सभेत मोर्चेकरुंची जाहिर सभा पार पडली. या सभेत उपस्थित बंजारा समाजाच्या नेत्यांनी मोर्चेकर्‍यांना मार्गदर्शन केले. यानंतर विशालकाय या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. बंजारा समाजाचे नेते अ‍ॅड .संजय राठोड,अभय चव्हाण, आ. राजेश राठोड,राजेश बन्सीलाल राठोड,विनायक राठोड, राम राठोड, महंत सुनिल महाराज, प्रा. अरविंद चव्हाण, उपसरपंच निलेश राठोड, एकनाथ चव्हाण, साहेबराव चव्हाण, भूपेश जाधव, गजानन चव्हाण , विठ्ठल चव्हाण, अनिल चव्हाण, राजेश फकिरा, निलेश राठोड, रमेश चव्हाण, उखा चव्हाण, राम राठोड, विनायक राठोड,रितेश चव्हाण, आकाश जाधव, छोटू पवार, विलास रामावत, अश्विन जाधव,यांच्या नेतृत्व काढण्यात आलेला हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, जिल्हा न्यायालय, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
 
 
यानंतर बंजारा समाजाच्या महिला शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावेत, हैदराबाद गॅझेटियर संदर्भान्वये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षणाबाबत दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे हैदराबाद सेंट्रल प्रोविन्स अँड बेरारच्या १९५० चा भारताचा गॅजेट तसेच १९५६ च्या करारनाम्यानुसार आणि तत्सम आयोगाच्या शिफारशीनुसार बंजारा समाजाला तात्काळ संविधानातील अनुच्छेद १४ व २१ प्रमाणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर शासन निर्णय काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व शासकीय सवलती लागू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी आकाश जाधव, सोनु चव्हाण, राजू नायक, दयाराम जाधव, राजू राठोड, दिगंबर चव्हाणतेजराव जाधव, बाबूसिंग जाधव, रितेश चव्हाण, उमेश राठोड, अश्विन जाधव, मांगीलाल महाराज, प्रकाश चव्हाण, नितीन राठोड, दिनकर चव्हाण, दिपक चव्हाण, गौरव राठोड, विट्ठल राठोड,यांच्यासह असंख्य बंजारा समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.