कौतुकास्पद! डोळ्यात अश्रू,चेहऱ्यावर आंनद... शेवटी मेहनतीचे फळ

संघर्षातून सिनेसृष्टीत झळकलेले नवीन स्टार

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
मुंबई,
Vishal Jethwa बॉलीवुडमध्ये अनेक कलाकारांनी कष्ट आणि चिकाटीने असा प्रवास केला आहे की त्यांच्या कथा अनेक वर्षे स्मरणात राहतील. नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव आणि दिवंगत इरफान खान यांसारखे कलाकार ‘फर्श’ पासून ‘आर्श’ पर्यंत पोहोचले आहेत आणि आपल्या मेहनतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कलाकारांच्या यादीत आता विशाल जेठवा यांचे नावही समाविष्ट झाले आहे.
 

 Bollywood new star, Vishal Jethwa struggle story, 
 
 
अलीकडेच मुंबईत करण जौहर आणि नीरज घयवान यांच्या सहकार्याने चित्रपट ‘होमबाउंड’ची खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. या स्क्रीनिंगला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली, त्यात विशाल जेठवा आपल्या मातेसोबत उपस्थित होते. ‘होमबाउंड’मध्ये विशालने जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्यासोबत काम केले असून, या चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री मिळालेली आहे. ‘मसान’ या सुप्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या नीरज घयवानने या चित्रपटासाठी जवळपास १० वर्षे मेहनत घेतली आहे.या खास कार्यक्रमादरम्यान विशाल जेठवा अनेकदा भावूक झाले आणि फोटो सेशन दरम्यान अश्रूंच्या साक्षीने त्यांचा संघर्ष समोर आला. त्यांच्या या भावनिक क्षणांनी उपस्थित सर्वांचे मनं हलवले. त्यांच्या अश्रूंना पाहून त्यांच्या आई देखील भावूक झाल्या होत्या आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होत्या. या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी विशालच्या या भावना त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची खरी कहाणी सांगतात असे म्हटले आहे.
 
 
 
दिवस रात्र कष्ट
 
 
विशालच्या आईने घरकामगार म्हणून दिवस रात्र कष्ट केले आहेत. त्यांनी घराघरं जाऊन झाडू-पोछा केला, सुपरमार्केटमध्ये सैनिटरी पॅड विकले आणि पती नारळ पाणी विकण्याचे काम करत होता. विशालने स्वतः एका मुलाखतीत आपल्या कुटुंबाच्या कठीण परिस्थितीचा खुलासा करताना सांगितले की, ‘मी फार गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या बहिणीने मला कान चित्रपट महोत्सवात सांगितले होते, “कुणतीही गोष्ट घडली तरी तू धास्ती घेऊ नकोस, कारण तू कामवाली बाईचा मुलगा आहेस.” माझ्या मम्मी लोकांच्या घरी झाडू-पोछा करायच्या, माझे वडील नारळ पाणी विकायचे. हे सगळं मी पाहिलं आहे. पण आता माझं जीवन खूप पुढे गेलं आहे.’
 
 
 
 
 
या कथेमुळे विशाल जेठवाच्या संघर्षाची आणि मेहनतीची जाणीव सर्वांपर्यंत पोहोचली आहे. फक्त अभिनयातच नव्हे, तर आयुष्यातल्या कठीण प्रसंगांशी लढून त्यांनी सिद्ध केलं की मेहनत आणि आत्मविश्वास असला तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. बॉलिवूडमध्ये त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.