डिगडोह,
Digdoh Awareness Forum नगर परिषद हद्दीत अल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्य फेरीवाले व विक्रेत्यांना त्यांच्या उपजीविकेचे प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्ट्रीट व्हेंडर म्हणून अधिकृत मान्यता देण्याची मागणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. डिगडोह जागृती मंचच्या नेतृत्वात शेकडो हॉकर्स, स्ट्रीट व्हेंडरच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले. डिगडोह जागृती मंचतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेली १० ते १५ वर्षे फेरीवाले डिगडोह परिसरात छोट्या दुकानांच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवित आहेत. मात्र अतिक्रमण मोहिमांमुळे त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला असून उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना नगर परिषदेकडून व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

फेरी विक्रेत्यांना तत्काळ जागा उपलब्ध न करून दिल्यास उपजीविकेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील डिगडोह जागृती मंचतर्फे या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना जागा देण्यासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. Digdoh Awareness Forum निवेदन देतेवेळी डिगडोह जागृती मंचचे मोनू सिंग, जितेंद्र मेश्राम, सतीश कन्हेरकर, बालू व्यवहारे, ज्ञानेश्वर चौधरी, नरेश टेंभरे, रवी चतुर्वेदी, संजू कोल्हे, विक्रम इंगळे, व्यंकटेश पंडलवार, ब्रिजेश मोरया, रवी कनेर, निशांत नचने, देवेंद्र डायरे, कमलेश ढबाले, संदीप बिसेन, मुन्ना सेठी, धनराज राऊत, गंगाप्रसाद, पवन राणे, रोहित राजपूत, दिलीप गोंड, सुनील निनावे, रवींद्र नाखले, अमित बोरकर, संजय शाहू, रामेश्वर बिसेन आदींसह शेकडो व्हेंडर्स, फेरीवाले उपस्थित होते.