राजस्थान,
Jaipur massage scam जयपूर शहरात ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली लुटीचे सत्र सुरू असल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही टोळी विविध क्लृप्त्यांनी लोकांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत होती. मालवीय नगरचे एसीपी आदित्य पूनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तीन वेगवेगळ्या पद्धतींनी ग्राहकांची लूट करणे स्वीकारले आहे.
ही कारवाई Jaipur massage scam जवाहर सर्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी कानसिंह नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कानसिंह जयपूरमधील गार्डन हॉटेलमध्ये थांबलेला असताना, त्याने मसाजसाठी ऑनलाईन शोध घेतला. गूगलवर सापडलेल्या एका एस्कॉर्ट वेबसाईटवर संपर्क साधून त्याने एका महिलेच्या मसाजसाठी पाच हजार रुपये अॅडव्हान्स दिले.नंतर संबंधित महिला काही पुरुषांसह हॉटेलबाहेर आली आणि आणखी पाच हजार रुपयांची मागणी केली. कानसिंहने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याच्या मोबाईल फोनसह एकूण 11,700 रुपये लुटण्यात आले.या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. वर्ल्ड ट्रेड पार्कच्या मागील भागातील हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील इतर फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. स्थानिक खबर्यांची मदत घेत, पोलीस निरीक्षक मदन कडवासरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने टोळीतील दोन सदस्यांची ओळख पटवली आणि त्यांना अटक केली.
अटकेत असलेले Jaipur massage scam आरोपी म्हणजे सुमित बसवाल (22, मूळ गाव खेरदा, सवाई माधोपुर) आणि आकाश (23, प्रतापनगर, जयपूर) असून, दोघेही सध्या जयपूरमधील लालरपुरा येथील मंगलम आधार अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते.पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे, ही टोळी तीन मुख्य पद्धतींनी लुटीचे प्रकार घडवत होती. प्रथम, ऑनलाईन माध्यमातून सुंदर मुलींचे फोटो दाखवून ग्राहकांकडून अॅडव्हान्स रक्कम घेतली जात होती, मात्र कोणतीही सेवा दिली जात नसे. दुसऱ्या प्रकारात, महिला आणि तिचे साथीदार ग्राहकाच्या संपर्कात येत आणि पैसे न दिल्यास त्याच्यावर हल्ला करून लूट केली जात असे. तिसऱ्या प्रकारात, मसाजच्या नावाखाली हॉटेलमध्ये जाऊन, नंतर संबंधित महिलेकडून छेडछाड किंवा बलात्काराचे खोटे आरोप लावून मोठी रक्कम वसूल केली जात होती.
या टोळीचे इतर सदस्य अजूनही फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. जयपूर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवर्जून सांगितले आहे. या प्रकरणामुळे शहरातील ऑनलाईन सेवा घेणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.