आरमोरी,
bachchu kadu शेतकरी बांधवांच्या जमिनी कोणी बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न करु नये. असा प्रयत्न झाल्यास त्याला त्याच जमिनीत जिवंत गाडू, असा सज्जड इशारा प्रहार संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.
तालुक्यातील कुरुड येथे 24 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या शेतकरी हक्क परिषदेत शेतकरी व समृद्धी महामार्गग्रस्त बाधीतांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल मारकवार, प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी प्रहार जनशक्ति पक्षाच्यावतीने प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातून ठाणेगांव बस स्टॉप येथे बच्चू कडू यांचे जंगी स्वागत करण्यात आले.bachchu kadu त्यानंतर साई दामोधर हॉल आरमोरी येथे जाहीर सभा, दिव्यांग व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित गडचिरोली-चंद्रपूर मधील दिव्यांग तसेच शेतकर्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.