वर्धा,
gambling-assault-on-police : सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिखबेडा येथे सुरू असलेल्या जुगारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ३ पोलिस उपनिरीक्षक तर एक सहाय्यक फौजदार असे तिघे जखमी झाले. ही घटना आज गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
सावंगी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या सिखबेड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सावंगी पोलिसांची चमूने सिखबेडा गाठला. यात पोलिस उपनिरीक्षक सतीश दुधाने, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे आणि सहाय्यक फौजदार संजय पंचभाई यांचा समावेश होता. कारवाईसाठी पोलिस आल्याची चाहूल लागताच जुगा-यांसह ज्याच्या घरी जुगार भरविण्यात आला होता त्याने पोलिसांवरच हल्ला चढविला. या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांवर थेट तलवार उगारली. यात दुधाने, शिंदे आणि पंचभाई हे जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच सावंगी पोलिस ठाण्यातील पोलिसांची दुसरी चमू तातडीने घटना