वाशीम शहरात भव्य नमो युवा मॅरेथॉनचे आयोजन

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
वाशीम,
namo yuva marathon पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे नशा मुक्त भारत व नशा मुक्त वाशीमसाठी रविवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा क्रीडा संकुल वाशीम येथून भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 

मॅरेथॉन  
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात अनेक समाजपयोगी कार्यक्रम भारतीय जनता पार्टीतर्फे राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. युवा मॅरेथॉन मध्ये शहरातील अनेक खेळाडू, युवकासह सामाजिक व धार्मिक संस्था सुद्धा तसेच शासकीय कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहेत. या मॅरेथॉन मध्ये सहभागी पुरुष व महिला स्पर्धकांना प्रत्येकी पाच रोख बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वाशीम जिल्हा अ‍ॅथलेटिस असोसिएशनचे विशेष सहकार्य सुद्धा या मॅरेथॉनला असणार आहे.
वाशीम शहरातील जिल्हा क्रीडा संकुल मधून ही मॅरेथॉन निघणार असून, पुरुषासाठी जिल्हा क्रीडा संकुल ते जुनी नगरपरिषद, दंडे चौक, गणेश पेठ, टिळक चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौक, ते जिल्हा क्रीडा संकुल असा मार्ग राहणार आहे.namo yuva marathon महिलांसाठी या क्रीडा संकुल ते आंबेडकर चौक, नगरपरिषद टेकडी, शिव चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौक, ते जिल्हा क्रीडा असा मार्ग राहणार आहे. नशामुक्त वाशीमसाठी या मॅरेथॉन मध्ये नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा वाशीम जिल्हा तर्फे करण्यात आले आहे.