नवरात्रोत्सवानिमित्त कारंजा माहूर नवी बससेवा सुरू

दररोज दोन फेर्‍या, प्रवाशांना मोठा दिलासा

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
कारंजा लाड, 
karanja mahur bus service कारंजा, माहूर, पोहरादेवी, दिग्रस आणि आर्णी या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी कारंजा—माहूर नवीन बससेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराने २५ सप्टेंबर पासून केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, यात्रेकरू आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे. नव्या मार्गावर रोज एकूण २ फेर्‍या धावणार आहेत. प्रत्येक फेरीचे अंतर सुमारे १२० किलोमीटर असून, पोहरादेवी—दिग्रस—आर्णीमार्गे ही बससेवा सुरु राहील.
 

sgg  
 
एकूण ४८० किलोमीटरचा प्रवास दररोज होणार आहे. कारंजा माहूर बस कारंजा येथून सकाळी ७.४५ वाजता व सकाळी १०.३० तर माहूर येथून दुपारी २ आणि संध्याकाळी ४.४५ वाजता सुरू करण्यात आली आहे. कारंजा व माहूर या दोन्ही ठिकाणी वर्षभर यात्रेकरूंची मोठी वर्दळ असते. पोहरादेवीच्या सिद्धपीठासह माहूरच्या रेनुका माता मंदिराकडे जाणार्‍या भाविकांसाठी या बससेवेची मोठी सोय होणार आहे. तसेच दिग्रस व आर्णीमार्गे प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांना, व्यापार्‍यांना आणि शेतकर्‍यांना दररोज ठराविक वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.karanja mahur bus service स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि लहानसहान व्यावसायिकांना मालवाहतुकीसाठीही ही बस उपयुक्त ठरणार आहे. ही बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर व किफायतशीर झाला आहे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.

कारंजा आगाराने नवरात्रोत्सवा निमित्त २५ सप्टेंबर पासून कारंजा माहूर ही बससेवा सुरू केली. नवरात्रोत्सवातील प्रतिसाद पाहिल्यानंतर प्रवाशांचा योग्य प्रतिसाद मिळाल्यास ही बससेवा नियमित करण्यात येईल.त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
रवींद्र मोरे आगार व्यवस्थापक