अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍यास पुण्यातून अटक

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
सेलू, 
minor-girl-kidnapped : अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा कुणाल उर्फ कुंदन चव्हाण (२१) याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीससुद्धा ताब्यात घेतले.
 
 

jlk 
 
 
 
अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा सेलू ठाण्यात नोंद होता. गुन्ह्यातील पीडित मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरू होता. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पथक तयार करण्यात आले.
 
 
या गुन्ह्यात तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपी व पीडित मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करून कुणाल चव्हाण हा पुणे येथे असल्याचे कळले. पथकाने शिताफीने सापळा रचून नमूद आरोपीस हिंजेवाडी, पुणे येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता मुलगी त्याचे सोबत राहत असल्याचे सांगितले. त्यावरून मुलीससुद्धा ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांचे मार्गदर्शनात सुभाष राऊत, दिवाकर परिमल, संजय राठोड, नितेश मेश्राम, शबाना शेख, नवनाथ मुंडे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, स्मिता महाजन यांनी केली.