नागपूर,
Nagpur News : नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशनच्या विदर्भ प्रांताच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना व परिचय वर्ग रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला.
उदघाटन रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे, एनएमओचे राष्ट्रीय सहसंघटक डॉ. कुमार अंगदी व डॉ. नरेंद्र पालीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नियमित उपक्रमांमध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, नागरिक कर्तव्यांची जाणीव, कुटुंब प्रबोधन, स्वदेशीचा अंगीकार या पाच घटकांचा समावेश असलेली ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना अंतर्भूत केली पाहिजे, असे अतुल मोघे यांनी सांगितले.
डॉ. नरेंद्र पालीवाल, डॉ. कुमार अंगदी, डॉ. सुरेश चारी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. धीरज गुप्ता यांनी उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. बी. एन. गंगाधर, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. विन्की रुघवानी, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. मनोज चांडक, डॉ. कांचन वनेरे, डॉ. कन्हैया चांडक, डॉ. मनीषा तामसकर, डॉ. गिरीश चरडे तसेच अनेक प्रख्यात डॉक्टर, वैद्यकीय व दंतवैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ प्रांताच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत सह-कार्यवाह अजय नवघरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
नवी कार्यकारिणी
अध्यक्ष- डॉ. निलेश अग्रवाल, उपाध्यक्ष- डॉ. राधा मुंजे व डॉ. अर्चना देशपांडे, महासचिव- डॉ. धीरज गुप्ता, सहसचिव- डॉ. मनीष तिवारी, संघटक- डॉ. विवेक ठोंबरे, सहसंघटक- डॉ. सजल बन्सल, कोषाध्यक्ष- रिपुंजय त्रिपाठी, सह कोषाध्यक्ष- डॉ. अमित कठोडे, संपर्क प्रमुख- डॉ. निलेश चांगले व डॉ. गौरव विढाळे, विद्यार्थी प्रभारी- डॉ. सुशील शिंदे,
सह प्रभारी- डॉ. काजल माटे, बौद्धिक प्रमुख- डॉ. अक्षय ढोबळे