आर्वी,
Navneet Rana : आ. सुमित वानखेडे मित्र परिवाराच्या वतीने २६ आणि २७ रोजी सायंकाळी ७ वाजता स्व. राजीव गांधी स्टेडियम येथे गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या गरबा महोत्सवात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आमदार वानखेडे यांनी मतदार संघाच्या विकासासोबत संस्कृतीही जोपासण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवरात्रानिमित्त आर्वी येथे दोन दिवस गरबा महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, आमदार दादाराव केचे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली येरावार आणि जिपच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे उपस्थित राहतील. या गरबा महोत्सवाच्या २६ आणि २७ रोजी आ. सुमित वानखेडे स्वतः पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवामुळे आर्वीतील नागरिकांना एकत्र येऊन सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. आयोजकांतर्फे जय्यत तयारी केली असून नागरिकांनी आपल्या मित्र परिवारासह या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आ. सुमित वानखेडे मित्र परिवाराने केले आहे.