मुंबई,
Jaya Bachchan भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ यांनी ‘गंगा देवी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांना छडीने झोडपले होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी नुकताच केला आहे. हा अनुभव त्यांनी सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितला.
२०१२ मध्ये Jaya Bachchan प्रदर्शित झालेल्या ‘गंगा देवी’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात निरहुआनं देखील महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. हे अमिताभ बच्चन यांचे भोजपुरी चित्रपटांतील पहिले पदार्पण होते. यापूर्वी त्यांनी ‘गंगा’ (२००६) आणि ‘गंगोत्री’ या चित्रपटांतही काम केले होते. या तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.निरहुआ यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन सेटवर खूप प्रेमळ आणि विनोदी स्वभावाचे होते, पण जया बच्चन मात्र फारच रागीट होत्या. एका दृश्यात त्यांना त्यांच्या पत्नीला शिव्या द्याव्या लागल्या आणि जोरात थोबाडीत मारायचं होतं. त्या सीनमध्ये निरहुआच्या आईची भूमिका साकारणाऱ्या जया बच्चन यांना शिव्या देण्याचं आणि छडीने मारण्याचं अभिनय करायचं होतं. मात्र, त्या इतक्या रागीट होत्या की त्यांनी खरंच निरहुआला छडीने मारलं.
निरहुआ म्हणाले,Jaya Bachchan “त्या मला दोन-तीन वेळा छडीने झोडपले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या म्हणाल्या, ‘तू माझ्या सुनबाईला का मारलास?’ मी सांगितलं की ते फक्त नाटक होतं, पण त्यांनी खरंच मला मारलं.” त्यांनी हे देखील नमूद केलं की, कदाचित ही मार अनायास झाली असेल, पण त्या मारण्याने त्यांना फारच वेदना झाल्या.या घटनेवरून निरहुआ म्हणाले की, त्यांना जया बच्चन यांनी छडीने मारल्यानंतरही ते प्रसन्न राहिले कारण त्यांना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप अभिमान आहे. “हे माझं दैवत आहेत,” निरहुआ म्हणाले, “अशा दिग्गजांसमोर काम करणं स्वप्नवत होतं. त्यांनी मला आरामात आणण्यासाठी विनोद करून माझ्या भीतीचा नाश केला.”भोजपुरी चित्रपटसृष्टीतील निरहुआ यांच्यासाठी हा अनुभव नेहमीच खास राहिलेला आहे. त्याने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा क्षण नेहमी स्मरणात ठेवण्यासारखा असल्याचं स्पष्ट केलं आहे.