तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई देण्याचे निर्देश

-सहपालकमंत्री ना. संजय सावकारे -*शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आणि साधला संवाद

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
बुलडाणा, 
Sanjay Savkare : सिंदखेडराज तालुयांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, शाळांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आज शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश, सावकारे यांनी यावेळी दिले.
 
 
 
bul
 
 
 
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत आ. मनोज कायंदे, माजी आ. तोताराम कायंदे, माजी आ. विजयराज शिंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे, तहसीलदार अजित दिवटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सावकारे यांनी सिंदखेडराजा तालुयातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या गावांना भेट देत शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकार्‍यांकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे आणि शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.तसेच यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईचे निधी तातडीने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावेत, अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
 
 
शेतकर्‍यांच्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे.पात्र शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि शेतकर्‍यांना लवकरात लवकर भरपाई मिळेल, यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी. लोणार सरोवराचीही पाहणी करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यासंबंधी सूचना आणि पर्यटनविकासासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला मंत्री सावकारे यांनी दिले.यावेळी उपवनसंरक्षक सरोज गवस, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील उपस्थित होते.