तळेगाव (श्या.),
Praful Waghdare : एक वर्षाच्या ’धम्म विनय’या साधनेसाठी श्रीलंकेला गेलेले तळेगांव (शा.पंत) ता. आष्टी येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रमचे व्यवस्थापक आचार्य प्रफुल ऊर्फ प्रदीप वाघदरे (३४) रा. ब्राम्हणवाडा ता. आर्वी यांचे केबल कार अपघातात निधन झाले झाली. प्रफुल ऊर्फ प्रदीप वाघदरे हे ४ सप्टेंबर रोजी एक वर्षाच्या धम्म विनय या साधनेकरिता केले होते.
अपघाताच्या वेळी मठात १३ बौद्ध भिक्षू केबल कारमधून प्रवास करी होते असे वृत्त आहे. केबल तुटून पडल्याने सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कुरुनेगाला रुग्णालयातील सूत्रांनी अदा डेराना यांना सांगितले की, मेल्सिरीपुरातील पानसियागामा येथील ना उयाना मठात (ना उयाना अरण्य सेनानाया) केबल कारची केबल तुटून खाली पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला आहे. काल रात्री (२४) कुरुनेगाला येथील बौद्ध वन मठात झालेल्या अपघातावेळी केबल कारमध्ये सुमारे १३ बौद्ध भिक्षू प्रवास करीत होते त्यापैकी ७ भिक्षुंचा मृत्यू झाला.
वाघदरे यांचे पार्थिव तळेगाव आश्रममध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून उद्या २६ रोजी रात्रीपर्यंत त्यांचे पार्थिव तळेगावला मानव विकास ज्ञानसाधना आश्रम येथे आणण्यात येईल असे सांगण्यात आले.