आ. देरकर यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता

प्रशासकीय अधिकाèयांशी चर्चेनंतर सोडले उपोषण

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा मारेगाव,
Sanjay Derdkar mediation मागील सोमवारपासून मार्डी येथील बाजारवाडी चौकात शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील प्रलंबित समस्या सोडविण्याकरिता सुरू असलेल्या उपोषणाची सांगता बुधवार, 24 सप्टेंबरला विविध विभागांच्या अधिकाèयांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करून आमदार संजय देरकर यांच्या हस्ते व तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली.
 
 
Sanjay Derdkar mediation
मारेगाव तालुका खंडित वीजपुरवठा सुरळीत करा, अवैध धंदे बंद करा, ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करा, ओला दुष्काळ जाहीर करा, सोयाबीन उत्पादकांना सरसकट 50 हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्या, 3 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्राचा अहवाल द्या, या प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन होते.उबाठा शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, संपर्क प्रमुख सचिन पचारे, उपतालुका प्रमुख विजय अवताडे, शरद ताजने उपोषणास बसले होते.
बुधवारी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्यासह महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे, श्यामसुंदर कुर्रा, बांधकाम विभागाचे महल्ले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संजय शिंदे, तालुका कृषी अधिकारी बुटले, पोलिस उपनिरीक्षक विकी जाधव यांनी उपोषणकर्त्याशी संवाद साधला.
 
 
चर्चेअंती आपापल्या विभागातील मागण्या पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण सोडले. यावेळी संजय निखाडे, सुनील कातकडे, दिलीप काकडे, मनीष मस्की, डिमन टोंगे, तसेच शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.