भावनिक साद! देवाभाऊ भावनिक आहेत; घरांसाठी निर्णय घ्यावा”

शशिकांत शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
मुंबई
shashikant shinde राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक साद घालत, माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. “देवाभाऊ भावनिक आहेत, ते जाताना काहीतरी पदरात देतील,” असे म्हणत त्यांनी कामगारांसाठी सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे स्पष्ट केले.
 

shashikant shinde demands housing formathadi workers devendra fadnavis 
मुंबईतील कामगारshashikant shinde  मेळाव्यात बोलताना शिंदेंनी सरकारकडे अनेक मागण्या मांडल्या. विशेषतः माथाडी कामगार कायदा आणि त्यांच्या घरांच्या प्रश्नावर त्यांनी सखोल चर्चा करत मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केलं की, “हा प्रश्न तुमच्यासाठी शुल्लक असेल, पण आमच्यासाठी हा आयुष्याचा आधार आहे. निर्णय घ्या, आम्ही विरोधक असलो तरी तुम्ही आम्हाला प्रेमाने घेतलं आहे.”शिंदे यांनी आपल्या भाषणात माथाडी चळवळीचे जनक अण्णासाहेब पाटील यांचा उल्लेख करत, “माथाडी कामगारांचा एकच देव आहे, तो म्हणजे अण्णासाहेब. बाकीचं सगळं फोटोपुरतं आहे,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी म्हटले की, “राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि कामगार अडचणीत आले आहेत. अशा संकटातही माथाडी कामगार कधीच मागे हटत नाही. यावेळी सुद्धा सर्व माथाडी कामगार एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहेत.”
 
 
 
 
कामगारांच्या shashikant shinde घरांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “वडाळा आणि कांजूरमागील घरांच्या प्रकल्पांबाबत निर्णय व्हावा. सिडकोचे दर खाजगी बिल्डरच्या तुलनेत अधिक आहेत. मार्केटच्या जवळ कामगारांचे घर असल्यास त्यांना मोठा फायदा होईल.” सिडकोच्या घरांच्या बाबतीत आंदोलने, सभागृहातील चर्चांनंतरही समाधानकारक निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्याचप्रमाणे, कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबतही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. “संचालक मंडळात झालेले बदल, हमाल घेण्याच्या प्रक्रियेतील अनियमितता यावर तातडीने निर्णय हवा आहे. बाजार समितीच्या कक्षेत कामगार संघटनांना अधिकार दिल्यास बाहेरील लोक अन्याय करू शकणार नाहीत,” असे त्यांनी सांगितले.शेवटी, शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आशेने पाहत म्हटले की, “आजचा कार्यक्रम आश्वासनांचा नसून पूर्ततेचा असावा. कामगारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्या, आणि आम्हाला एक दिवस तुमचा सत्कार करण्याचा योग येऊ द्या.”
 
 
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या हजारो माथाडी कामगारांनीही शिंदेंच्या भावना उचलून धरत एकसंघतेने टाळ्यांचा गजर करत पाठिंबा दर्शवला. आता मुख्यमंत्री फडणवीस या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण माथाडी कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.