मंगरूळनाथ,
soybean nafed center नाफेड केंद्र उशिरा सुरू होत असल्यामुळे शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते, ही बाब लक्षात घेऊन सोयाबीन काढण्यापूर्वीच नाफेड केंद्र तात्काळ सुरू करावे, अशी मागणी शेतकरी रवींद्र इंगोले यांनी केली आहे. गेली अनेक वर्षापासून नाफेड केंद्र हे उशिरा सुरू होते. त्यामुळे या नाफेड केंद्राचा फायदा अल्पभूधारक शेतकर्याऐवजी फक्त मोठ्या शेतकर्यांनाच होतो. यामध्ये उल्लेखनीय बाब अशी की, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकर्याचा सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
यामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. याशिवाय अल्पभूधारक शेतकर्याकडे साठवणूक करण्याकरता पुरेशी जागा नसते. कर्ज काढून पेरणी व शेतीची मशागतीसाठी पिकविण्यापुर्वी घेतलेले कर्ज फेडण्याचे दडपण असते. त्यामुळे या शेतकर्यांना सोयाबीन विकण्याची घाई असते. मात्र, दरवर्षी नाफेड केंद्र उशिरा सुरू केल्या जाते परिणामी अल्पभूधारक शेतकर्यांना कमी किमतीमध्ये सोयाबीन विकावे लागते.soybean nafed center यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे सोयाबीनची काढणी होण्यापूर्वी नाफेड केंद्र सज्ज करण्यात आले तर यामध्ये अल्पभूधारक शेतकर्यांचा आर्थिक फायदा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन तात्काळ नाफेड केंद्र सुरू करण्यात यावे तसेच यामध्ये अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी यांची प्रथम प्राधान्याने खरेदी करावी, अशी मागणी केली. मागणी पुर्ण न केल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.