आशिया कप फेरीपूर्वी सूर्यकुमारवर बंदी येणार?

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
दुबई,
Suryakumar will be banned आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानवर भारताच्या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या वक्तव्यांविरोधात आयसीसीकडे तक्रार नोंदवली असून, आयसीसीचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला ई-मेलद्वारे चौकशीची माहिती दिली आहे. १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी आणि पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने केलेल्या पिसिबीने आक्षेप घेतला आहे. यावेळी त्यांनी विजय भारतीय जवान आणि दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना समर्पित केला होता. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सरकार व बीसीसीआयच्या सूचनेनुसार भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.
 

Suryakumar will be banned 
 
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, हा प्रकार बहुधा पहिली चूक म्हणून गणला जाईल, ज्यामध्ये खेळाडूवर बंदी न घालता सामन्याच्या फीवर दंड आकारला जातो. दुसऱ्या किंवा त्यापुढील उल्लंघन झाल्यासच बंदीचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे सूर्यकुमारवर बंदी येण्याची शक्यता जवळजवळ नाही, Suryakumar will be banned मात्र दंड आकारला जाऊ शकतो. सूर्यकुमार यांना आरोप नाकारल्यास औपचारिक सुनावणी होईल, ज्यामध्ये आयसीसी रेफरी, सूर्यकुमार यादव आणिपिसिबीचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या सुनावणीनंतर अंतिम फेरीत त्यांचे खेळणे शक्य होईल की दंड भरावा लागेल, याचा निर्णय स्पष्ट होईल. आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादव हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.