नवी दिल्ली,
Test of Agni-Prime missile भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेत रेल्वेवरून ‘अग्नि-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाने विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टममधून हे प्रक्षेपण केले. यामुळे भारताने क्षेपणास्त्र चाचणी क्षेत्रात नवे पर्व गाठले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर या ऐतिहासिक चाचणीची माहिती दिली आणि व्हिडिओ शेअर करत यशस्वी चाचणीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, ही चाचणी प्रथमच रेल्वे नेटवर्कवरून करण्यात आली असून यासाठी कोणत्याही विशेष पूर्वअटींची आवश्यकता नाही. त्यामुळे देशातील कुठेही रेल्वे नेटवर्कवरून कमी वेळेत, कमी दृश्यमानतेसह क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येणार आहे.

अग्नि-प्राइम हे मध्यम-श्रेणीचे, अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज असे क्षेपणास्त्र आहे. २००० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची त्याची क्षमता आहे. कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टीमसह रेल्वेवरून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताने आत्मसात केली असून या क्षेत्रात तो जगातील निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे. Test of Agni-Prime missile या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडिओ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, अग्नि-प्राइमची ही कामगिरी भारताच्या संरक्षण सामर्थ्याला आणखी बळकटी देणारी आहे.