नोएडा,
Uber driver misconduct Noida दिल्लीलगत असलेल्या नोएडामध्ये एका उबर कॅब चालकाकडून पाच तरुणींशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅफिकमुळे मार्ग बदलण्याची विनंती केल्यावर संतप्त झालेल्या चालकाने महिला प्रवाशांना अपशब्द वापरले, त्यांच्यावर डंडा घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि एका तरुणीचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्नही केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काय झाले असे?
ही घटना Uber driver misconduct Noida मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी घडली. इंस्टाग्राम युजर तशू गुप्ता हिने ही माहिती आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या म्हणण्यानुसार, तिने आणि तिच्या चार मैत्रिणींनी बॉटनिकल गार्डन येथून सेक्टर-१२८ पर्यंत उबर कॅब बुक केली होती. गाडीचा क्रमांक UP 16 QT 4732 असून चालकाचे नाव बृजेश कुमार सिंह (३८) असे आहे. ट्रॅफिकमुळे त्यांनी अंडरपासने जायचा सल्ला दिला असता चालकाने रागाने नकार दिला आणि लगेचच अपशब्द बोलायला सुरुवात केली.तशू गुप्ता यांनी सांगितले की, चालकाने महिलांना उद्देशून अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरली. “तुमची औकात काय आहे? तुमच्यासारख्या दहा ठेवल्या आहेत मी कामासाठी,” असे म्हणून त्याने महिलांचा अवमान केला. गाडीमधून उतरतानाही त्याने तशू यांना धक्का दिला आणि पैसे मागू लागला. पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या चालकाने गाडी पार्क करून डिक्कीमधून एक पांढर्या रंगाचा रॉड काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तशू यांनी मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडिओ शूट करताना चालकाने तिचा मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न केला, मात्र ती प्रसंगावधान राखत दूर झाली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उबर कंपनीने देखील प्रतिक्रिया देत हे वर्तन अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले. कंपनीने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे सांगत, तशू यांच्याशी संपर्क करून तपशील मागवले आहेत, जेणेकरून घटनेची सखोल चौकशी करता येईल.
तात्काळ कारवाई
घटनेची गंभीर Uber driver misconduct Noida दखल घेत नोएडा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी चालक बृजेश कुमार सिंह याला अटक केली आहे. एसीपी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-३९ पोलिस ठाण्याच्या पथकाने केवळ अर्ध्या तासात चालकाला अटक केली असून संबंधित कॅब देखील जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बृजेश कुमार सिंह हा उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे.या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतुकीत महिलांनी सुरक्षिततेची अपेक्षा बाळगणे स्वाभाविक असतानाही अशा घटना त्या अपेक्षांवर पाणी फेरतात. प्रशासनाने कठोर कारवाई करत भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, याची हमी देणे गरजेचे आहे.