विक्रांत मॅसीची ‘दोस्ताना 2’मधून धर्मा प्रोडक्शनमध्ये एन्ट्री

नवीन लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
मुंबई
Vikrant Massey अभिनेता विक्रांत मॅसी आता करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटातून मोठ्या स्केलवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘दोस्ताना 2’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात विक्रांत मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांनी स्वतः या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही त्यांची पहिलीच धर्मा प्रोडक्शनची फिल्म असणार आहे.
 

Vikrant Massey 
‘दोस्ताना 2’ या चित्रपटाच्या सुरुवातीच्या कास्टमध्ये कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि नवोदित अभिनेता लक्ष्य यांचा समावेश होता. मात्र, निर्मात्यांनी आता ही स्टारकास्ट पूर्णपणे बदलली असून, नवीन तुकडीत विक्रांत मॅसी आणि लक्ष्य हे दोन प्रमुख कलाकार असतील.एका मुलाखतीत विक्रांत मॅसीने स्वतः या चित्रपटात काम करत असल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले, “मी ‘दोस्ताना 2’ करतोय. ही माझी पहिली धर्मा फिल्म आहे. मला माहिती नाही की मी हे का लपवतोय, पण ही बातमी बहुधा आधीच बाहेर आली आहे.”
 
 
या चित्रपटाबाबत Vikrant Massey आणखी माहिती देताना विक्रांत म्हणाले की, प्रेक्षकांना यात आपला एक वेगळा आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळेल. “मी चित्रपटात डिझायनर कपडे घातलेला दिसणार आहे. करण सर याची पूर्ण काळजी घेत आहेत की मी चांगले कपडे घालावेत, फॅन्सी सनग्लासेस वापरावेत. चित्रपटाची शूटिंग युरोपमध्ये कुठे तरी सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.चित्रपटातील लीड अभिनेत्रीबाबत विचारले असता मात्र विक्रांत मॅसीने मौन बाळगले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ते मी नाही सांगणार. ती घोषणा करण सरच करतील, कारण ती देखील मोठी घोषणा असेल.” मात्र, लक्ष्य या चित्रपटाचा भाग असल्याचे त्यांनी निश्चित केले.लक्ष्य याला अलीकडेच आर्यन खानच्या दिग्दर्शनाखालील ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळाले होते. आता तो विक्रांत मॅसीसोबत ‘दोस्ताना 2’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘दोस्ताना 2’ ही करण जोहर निर्मित ‘दोस्ताना’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या यशस्वी चित्रपटाची पुढची कडी मानली जाते. आता विक्रांत मॅसी आणि लक्ष्य यांच्या जोडीला प्रेक्षक कितपत स्वीकारतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ती देखील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.