अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीत तालुक्यातील मोजयाच गावांचा समावेश

प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

    दिनांक :25-Sep-2025
Total Views |
मानोरा, 
heavy rains राज्यातील अतिवृष्टी ने बाधीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार कोटी पेक्षा अधिक निधी राज्य शासनाने मंजूर केला असून, वाशीम जिल्हा करिता १४५ कोटीपेक्षा अधिक निधीला मान्यता दिली. मात्र, मानोरा तालुयातील बोटावर मोजण्या एवढ्या गावांचा समावेश बाधित क्षेत्रामध्ये करून या तालुयातील मोठ्या संख्येत प्रचंड नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या तोंडाला निष्क्रिय लोकप्रतिनिधी व बेजबाबदार अधिकारी कर्मचार्‍यांमुळे पाने पुसण्यात आल्याचा लेखी आरोप प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आला आहे.
 
 

अतिवृष्टीग्रस्त 
 
 
उन्हाळा, हिवाळा व प्रचंड पावसाळ्याची तमा न बाळगता सर्वांसाठी धान्यराशी पिकविणारा मानोरा तालुयातील शेतकरी मागील काही महिण्यांपासून झालेल्या मुसळधार पाऊसरूपी अतिवृष्टीने पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे.तालुयातील सहाही महसूल मंडळातील बहुतांश शेतकर्‍यांचे खरीप पिक हातातून गेल्याची जमा असताना शासनाने केवळ २० गावांचा समावेश नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या यादीत टाकून काही लक्ष रुपयांचा निधी देवून बळीराजांच्या जखमेवर मीठ चोळून क्रूर चेष्टा केली असल्याचा लेखी आरोप तहसीलदारांमार्फत राज्याच्या महामहीम राज्यपालांना दिलेल्या निवेदनाद्वारा केला आहे.
जुलै व ऑगस्ट या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी चा पंचनामा प्रशासकीय यंत्रणेद्वारे पारदर्शक रित्या न झाल्याने या तालुयातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची पाळी आल्याने त्याला जबाबदार असणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका आपदा नियंत्रण प्राधिकार्‍यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महामहीम राज्यपालांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारा केली आहे.